
हे आसन शरीर सुदृढ, सामर्थ्यवान आणि पिळदार बनवण्यास उपयुक्त आहे. हे आसन करणे थोडे कठीण आणि कष्टप्राय आहे, त्यामुळे ज्या साधकांना हे आसन करावयाचे आहे त्यांनी जिद्दी आणि चिकाटीने प्रयत्न करावा.
कृती: -
प्रथम पद्मासनावर बसावे. आता दोन्ही हात पाठीमागून नेऊन उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरावा. ह्या आसनाच्या पूर्णावस्थेस शरीर सरळ ताठ ठेवणे गरजेचे आहे. आता श्वासोच्छ्वास हळू-हळू चालू ठेवावा.
हे आसन यथाशक्ती करावे आणि हळू-हळू जास्तीत जास्त वेळ करावे.
फायदे: -
१.) दोन्ही गुढघे आणि पायांच्या स्नायूंवर भार पडत असल्यामुळे त्यांना चांगला व्यायाम मिळून दोन्हीवर चांगला परिणाम होतो.
२.) ह्या आसनाच्या नियमित सरावाने शरीर लवचिक बनते.
३.) हृदय, फुफुसे, जठर, यकृत आणि पाठीच्या कण्याची दुरबात नाहीशी होऊन ते कार्यक्षम बनतात.
४.) अपचन, पोटात वायू धरणे, अजीर्ण आणि पोटात दुखणे ह्यांसारख्या विकारांवर हे आसन म्हणजे रामबाण उपाय आहे.
५.) तसेच पद्मासनापासून मिळणारे सर्व फायदे ह्या आसन द्वारे मिळतात.
Post a Comment
Post a Comment
please do not enter spam link in the comment box