पद्मासन

पद्मासन

पद्म म्हणजे कमळ. ह्या आसनप्रकारात पायांची स्तिथी कमळाकृती दिसते म्हणून ह्या आसनाला पद्मासन म्हणतात.

ध्यान-धारणा आणि जप-साधनेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे.

 

कृती: -

प्रथम सतरंजीवर पाय लांब करून बस. आता उजव्या पायाचे तळपाय डाव्या पायाच्या जांघेवर ठेवा आणि डाव्या पायाचे तळपाय उजव्या पायाच्या जांघेवर ठेवावे. आता पाठीचा कणा म्हणजेच मेरुदंड आणि मानेपासून ते डोक्यापर्यंत ताठ सरळ ठेवावेहाताचे पहिले बोट(तर्जनी) आणि अंगठा योग-मुद्रेत आणून उजवा हात उजव्या मांडीवर आणि दावा हात डाव्या मांडीवर ठेवावे. आता डोळे अलगत बंद ठेऊन श्वासावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करावा. सुरवातीला हे आसन जेव्हडे जमेल तेव्हड्या वेळच करावे, पण हळू हळू वेळ वाढवावा.

काही साधकांना सुरवातीला काही दिवस ह्या अवस्थेत येण्यास खूप त्रास होईल, पण चिकाटी सोडल्यास हळू हळू हे आसन करता येईल.

 

फायदे: -

.) ह्या आसनामुळे अंत:स्त्रावी ग्रंथी कार्यक्षम बनतात.

.) दमा,निद्रानाश ह्यासारखे रोग बरे होतात.

.) शरीरातील मेद कमी होऊन जोम वाढतो.

.) जप, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी ह्या अवस्थांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे आसन आहे.

.) हे आसन कुंडलिनी-जागृत करण्यास अत्यंत उपयोगी आसन आहे.


Post a Comment

please do not enter spam link in the comment box